Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

अपघातात दोन तरुण गंभीर जखमी

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू – शहरात वेगवेगळ्या अपघातात वाहनांच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर भागात अपघाताच्या घटना घडल्या. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेण्यात येत आहे.

भर चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण – सविस्तर बातमी 

कोथरूड भागात भुसारी काॅलनीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. ऋतिक एडने (वय २२, रा. पिंपळे निलख) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी आकाश अभिजित अजित भेके (वय २३, रा. जुन्नर) गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ऋतिक आणि त्याचा मित्र आकाश हे बाह्यवळण मार्गावरुन कोथरूडमधील भुसारी काॅलनीकडे निघाले होते. सेवा रस्त्यावर दुपारी एकच्या सुमारास समोरुन भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने दुचाकीस्वार ऋतिक आणि सहप्रवासी आकाश यांना धडक दिली. अपघातात ऋतिक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीवरील सहप्रवासी मित्र आकाश गंभीर जखमी झाला. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच ऋतिक याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करत आहेत.

हडपसर-मुंढवा रस्त्यावर मांजरी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेला सहप्रवासी तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. कुणाल संतोष घाडगे (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाता महेश बबन घाडगे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा चुलत भाऊ महेश हे शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास मुंढवा रस्त्याने निघाले होते. त्या वेळी हाॅटेल धनगर वाड्यासमोर समोरुन भरधाव वेगात आलेल्या मोटारीने दुचाकीस्वार कुणाल आणि महेश यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

बसच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण ठार

वडगाव बुद्रुक परिसरात सिंहगड महाविद्यालय रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी झाला. स्वप्नील संपतराव पवार (वय २३, रा. शिवाजीनगर, कडेगाव, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणारा बसचालक धनाजी शंकर चव्हाण (वय ४१, रा. ओंकार हाईट्स, नऱ्हे) याला अटक करण्यात आली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी ऋतुजा कदम हिला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा हे शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वडगाव बुद्रुकमधील सिंहगड महाविद्यालय रस्त्याने निघाले होते. त्या वेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार स्वप्नील आणि ऋतुजा यांना धडक दिली. अपघातात स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच स्वप्नील याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके तपास करत आहेत.
—-

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×