Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

भर चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

खडकीतील चर्च चौकातील घटना; चौघे अटकेत

marathinews24.com

पुणे – भर चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण – दुचाकी वेडीवाकडी चालविल्याने विचारणा करणाऱ्या पोलिसांना भर चौकात टोळक्याने मारहाण केली. मुंबई-पुणे रस्त्यावरील चर्च चौकात गुरुवारी (३१ जुलै) रात्री ही घटना घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी चौघांना अटक केली.

सिंहगड रस्ता परिसरात टोळक्याची दहशत – सविस्तर बातमी 

जुनैद इक्बाल शेख (वय २७, रा. आदित्यनगर, भोसरी), नफीज नौशाद शेख (वय २५, रा. आदित्यनगर, भोसरी), युनुस युसुफ शेख (वय २५, रा. गौरीनगर, भोसरी, मुळ रा. भुसावळ), आरिफ अक्रम शेख (वय २५, रा. संत तुकारामनगर, भोसरी) यांना अटक करण्यात आली. याबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोपाल गोठवाल (वय २८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी गोठवाल आणि काजळे हे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात नियुक्तीस आहेत. ते गुरुवारी (३१ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. त्या वेळी दोन आरोपी दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघाले होते. त्या वेळी गस्त घालणारे पोलीस कर्मचारी गोठवल आणि काजळे यांनी आरोपींना दुचाकी वेडवाकडी का चालवितो ? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ‘विचारणा करणारा तू कोण? ’ असे आरोपी त्यांना म्हणाले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना दोघांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरील दोघा आरोपींनी पोलीस कर्मचारी गोठवाल आणि काजळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपींचे दोन साथीदार दुसऱ्या दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी पोलीस कर्मचारी गाेठवाल आणि काजळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गोठवाल रस्त्यात पडले. चौघा आरोपींनी गोठवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत त्यांचा गणवेश फाटला. काजळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी काजळे यांनाही धक्काबुक्की केली. काजळे यांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती कळविली. गस्त घालणारे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत पोलीस कर्मचारी गोठवाल यांचे डोके, छातीला दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौघा आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

तरुणीचा विनयभंग, आरोपीविरुद्ध २४ तासात आरोपपत्र

कामावर जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध हडपसर पोलिसांनी २४ तासात आरोपपत्र दाखल केले. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुणीला आरोपी सुमीत त्रास देत होता. तो तरुणीला त्याच्याबरोबर राहण्यासाठी आग्रह करत होता. ती कामावरुन ये-जा करत असताना तो तिचा पाठलाग करायचा. तिला अडवून तिच्यासोबत असभ्य वर्तन करत होता. आरोपीच्या त्रासामुळे तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्वरीत या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर पाेलिसांनी तरुणीचा जबाब भारतीय न्याय संहितेतील कलम १८३ अन्वये नोंदविला. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले, तसेच आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली.

गुन्ह्याच्या तपासात ई-साक्ष प्रणालीद्वारे पुरावे संकलित करण्यात आली. पुरावे, तसेच जबाबासह पोलिसांनी लष्कर न्यायालयात आरोपी चाबुकस्वारविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

विवाहच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख झाली होती. विवाहाचे आमिष दाखवून त्याने तरुणीाला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्याने विवाहास नकार दिला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. विवाहाच्या आमिषाने एका युवतीला पळवून ने्लयाची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत युवतीच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. भारती विद्यापीठ परिसरातील एका युवतीला आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत युवतीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×