सिंहगड रस्ता परिसरात टोळक्याची दहशत

सिंहगड रस्ता पोलीस

तरुणाचा खुनाचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – सिंहगड रस्ता परिसरात टोळक्याची दहशत –  वादातून टोळक्याने दहशत माजविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात घडली. टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. एका तरुणावर कोयत्याने वार केला. वाहनांची तोडफोड, तसेच तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामकिसन गोरोबा टापरे (वय ४९, रा. खोराड वस्ती, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहन गोरे याच्यासह पाच ते सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृतीतून माणुसकी, एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला– रतन शारदा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन गोरे आणि साथीदार गुरुवारी (३१ जुलै) रात्री हिंगणे खुर्दमधील खोराड वस्ती परिसरात आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत’, असे म्हणून टोळक्याने कोयते आणि गज उगारून दहशत माजविली. टापरे तेथे थांबले होते. त्यावेळी टोळक्याने टापरे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. टापरे यांनी वार हुकविला. कोयत्याचा वार त्यांच्या कानाला चाटून गेल्याने ते जखमी झाले. टोळक्याने खोराड वस्ती परिसरात लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. दहशत माजवून टोळके पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी टोळक्याने धनकवडी भागात दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती.

बेकायदा पिस्तूल बाळगणारा गजाआड

पुणे-बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.राहुल संजय नेटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव अहे. हडपसर येथील कीर्तने बाग परिसरात नेटके थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार विनाेद साळुंके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

नेटकेने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून आणले?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ट पोलीस निरीक्षक माया देवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक फौजदार राजू कदम, हवालदार विनोंद साळुंके, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडकर यांनी ही कामगिरी केली.
—-

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×