अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल

अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात वाहतूक बदल

छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद

marathinews24.com

पुणे – अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल – अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१२ ऑगस्ट) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिक जीवनात विवेकाचे अधिष्ठान हवे-अविनाश पाटील – सविस्तर बातमी 

अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. शहर, तसेच जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या भागातील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, डेक्कन जिमखानामार्गे इच्छितस्थळी जावे. छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, खंडुजीबाबा चौक, टिळख रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, असे वाहतूक पोलिसानी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×