Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बदल

marathinews24.com

पुणे – कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०२६ रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.‘जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार आहेत. यापार्श्वभूमीवर बुधवारी दुपारपासून नगर रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. नगर रस्त्यावरील वाहतूक बदल एक जानेवारी २०२६ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

पाणी आणि शेतीशिवाय मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही- डॉ. सुरेश प्रभू – सविस्तर बातमी

पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहने लावण्याची ठिकाणे

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहेत. वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी (मोटारी, तसेच हलकी चारचाकी वाहने), आपले घर शेजारील वाहनतळ, मोनिका हाॅटेलशेजारी, तुळापूर फाटा रौनक स्वीटजवळ (दुचाकी वाहने), थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, लोणीकंद आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा (बस, टेम्पो), पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मोकळे मैदान, थेऊर रस्ता, ज्ञानमुद्रा ॲकडमी मैदान, थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, सोमवंशी ॲकडमी,

अवजड वाहनांना बंदी

शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पुल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×