Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Traffic Diversion : पुण्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेत वाहतूक बदल

Traffic Diversion : पुण्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेत वाहतूक बदल

म्हात्रे पुलासह पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – Traffic Diversion : ‘एमपीएससी’विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेतील लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; १३ जणांना लुटले – सविस्तर बातमी

‘एमपीएससी’ अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू केले आहे. वाहन चालकांनी लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकातून पत्रकार भवनमार्गे एस. एम. जोशी पुलाकडे जाऊ नये. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आले असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले.

नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरातून एस. एम. जाेशी पूलमार्गे कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना, तसेच कोथरूडकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलीस चौकी चौकातून म्हात्रे पुलमार्गे इच्छितस्थळी जावे. Traffic Diversion पूना हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनांनी शक्यतो पत्रकार भवन, एस. एम. जोशी पूल या रस्त्याचा वापर करु नये. या भागातील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक बदल केले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×