Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेरराव

Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेरराव

सिग्नल तोडणे, मोबाईलचा वापर आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळण्याचे आवाहान

marathinews24.com

पुणे – गंभीर आजाराने मरण पावणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी देऊ नये. वाहतुकीच्या नियमांचे Traffic Rules Pune पालन करुन पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आहेरराव यांनी केले.

पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली – सविस्तर बातमी 

जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने आयोजित अखिल मंडई मित्र मंडळ चिंचवड येथे लोकसंवाद कार्यक्रमात श्री. आहेरराव यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ उपस्थित होते.

रस्ते वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामार्ग वाहतूक पोलीस तसेच मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सुरक्षितपणे चालवावे, Traffic Rules Pune विनापरवाना वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविल्यास ५ हजार रुपये दंड आहे. सिग्नल तोडल्यास पाचशे रुपये दंड, वारंवार सिग्नल तोडून जाण्याची चूक केल्यास पंधराशे रुपये पर्यंत दंड व तीन महिन्यासाठी परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात येतो. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

दुचाकी चालविताना तसेच मागे बसताना हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहनाची वेगमर्यादा पाळावी आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×