Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात पावसामुळे १० ठिकाणी झाडे पडली

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पडलेली झाडे हटवली

marathinews24.com

पुणे – शहरासह परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दहा ठिकाणी झाडे कोसळली. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर दिवे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. झाडे कोसळल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले.

पाकिस्तानी गायकाला आमंत्रित केल्याचा आरोप, पबजवळ शिवसैनिकांचे आंदोलन – सविस्तर बातमी

शहरात रविवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. शहर, तसेच परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दहा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. झाडे कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. झाडे कोसळल्याने रिक्षा, तसेच बसचे नुकसान झाले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. सोमवारी शहर, परिसरात संततधार पाऊस सुरू होता.

पावसामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला होता. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. पावसामुळे अनेक जण माेटार घेऊन कामावर निघाले. वाहतूक नियोजनासाठी प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.पावसामुळे पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे घाटातील डोंगर फोडण्यात आला आहे. ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन डोंगर फोडण्यात आल्याने दगड सैल झाले आहेत. त्यामुळे दिवे घाटात दरड कोेसळण्याच्या घटना यंदा पावसाळ्यात घडल्या आहेत. घाटातून जाणाऱ्या वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटातील डोंगर कपारीच्या परिसरात लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. पावसामुळे दिवे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×