ठिकठिकाणी पाणी तुंबले, वाहतूक संथगतीने
marathinews24.com
पुणे – शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे २० ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली.
शहरात मंगळवारी दुपारी साडे तीननंतर पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी पावसााचा जोर वाढला होता. वेगवेगळ्या भागात झाडांच्या फांद्या कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागातील अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. शहर परिसरात मंगळवारी रात्रीपर्यंत २० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा – सविस्तर बातमी
अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला नागरिकांनी झाडपड, पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. येरवडा, कोरेगाव पार्क, धानोराी, टिंगरेनगर, एरंडवणे, ऊरळी देवाची, बावधन, मुकुंदनगर, हडपसर भागतील काळेपडळ, काळे- बाेराटेनगर, फातिमानगरसह वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
धनकवडीतील तीन हत्ती चौक परिसरात सोसायटीतील सीमाभिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.