Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सोसाट्याच्या वार्‍यामुळे २० ठिकाणी झाडे कोसळली

पुण्यातील विविध ठिकाणी झाडपड

marathinews24.com

पुणे – मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात झाडपडीच्या २० घटना घडल्या असून, सुदैवाने घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमक दलाच्या जवानांनी दिली आहे. शहर, परिसरात गुरुवारी (दि. १२) रात्री नऊनंतर पाऊस सुरू झाला. त्यानंतर सलग दोन तास जोरात पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यासोबतच सोसाट्याचा वार्‍यामुळे वेगवेगळ्या भागात २० ठिकाणी झाडे कोसळली.

नवले पुलाजवळ जेष्ठ महिलांना नाल्यात वाहून गेली –  सविस्तर बातमी

पाषाण रस्त्यावरील पंचवटी परिसरात मोठे झाड मोटारीवर कोसळले. जवानांनी फांद्यांखाली अडकलेली मोटार फांद्या कापून बाहेर काढली. भागातील रस्ता झाड पडल्यानंतर बंद झाला होता. जवानांनी फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला.

धायरीत फर्निचर कारखान्यात आग फर्निचर तयार करण्याच्या कारखान्यात आग लागल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. पुणे महानगरपालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाली. आगीत फर्निचर साहित्य, लाकूड, दुचाकी असे साहित्य जळाले आहे. अग्निशमन दलातील अधिकारी प्रभाकर उमराटकर, निलेश पोकळे, भरत गोगावले, पांगारे, हर्षद कांबळे, ऋषीकेश हुंबे यांनी आग आटोक्यात आणली. दांडेकर पूल परिसरातील दुकानात गुरुवारी रात्री आग लागली. आग लागल्यानंतर जवानांनी छोटा सिंलिंडर बाहेर काढला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×