‘नृत्यसमिधा’मधून गुरू प्रभा मराठे यांना मानवंदना

‘नृत्यसमिधा’मधून गुरू प्रभा मराठे यांना मानवंदना

पुणेकरांनी अनुभवला भाव, लय व अभिव्यक्तीच्या संगमातून शास्त्रीय नृत्याचा मनोहारी अविष्कार

marathinews24.com

पुणे – घुंगरांचा तालबद्ध नाद… चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्रा… कलात्मक व लयबद्ध अदाकारी… पारंपरिक वेशभूषेत कलाकारांनी साकारलेले भावविश्व… अशा मनोहारी नृत्याविष्काराची अनुभूती पुणेकरांनी घेतली. ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘नृत्यसमीधा’मधून नृत्यगुरू प्रभा मराठे यांना मानवंदना देण्यात आली. कथक नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांच्या लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स, कलाछाया आणि कलाधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोखलेनगर येथील कलाछाया सांस्कृतिक केंद्रात आयोजित नृत्यमैफलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

मस्साजोग ग्रामपंचायतची पोटनिवडणूक काही तासांवर; उमेदवारांकडून प्रचाराला वेग – सविस्तर बातमी 

विविध नृत्यसंघांनी सादर केलेल्या रचनांमधून शास्त्रीय नृत्याच्या परंपरेचा समृद्ध वारसा उलगडला. रश्मी जंगम पांडकर व त्यांच्या ताफ्याने सादर केलेल्या नृत्याविष्कारात लयबद्धता आणि भावपूर्णता यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. मुल्ला अफसर खान व वेदांती भागवत महाडिक यांच्या नृत्यसंघांनीही विविध अंगांनी नृत्य साकारत प्रेक्षकांना भारावून टाकले. समूह नृत्यांमध्ये कलाकारांचा अचूक समन्वय, नेटक्या रचना आणि प्रभावी पदन्यास यामुळे प्रत्येक सादरीकरण उठून दिसले.

‘नृत्यसमिधा’मधून गुरू प्रभा मराठे यांना मानवंदना

‘दशावतार’सारख्या संकल्पनांमधून सादर झालेल्या नृत्यांमध्ये नाट्यमयता, ताकद आणि अध्यात्मिक भावनांचा प्रभावी आविष्कार झाला. पारंपरिक वेशभूषा, भावपूर्ण मुद्राभिनय आणि रंगमंचावरील सुसंगत प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. कृष्णध्वनी, रुक्मिणी स्वयंवर, प्रतिभा, शिवशक्ती या नृत्यप्रस्तुतींनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येत गुरू प्रभा मराठे यांच्या स्मृतींना नृत्यांजली अर्पण केली, तेव्हा संपूर्ण सभागृह भावनांनी भारून गेले.

या कार्यक्रमाला विदुषी राजश्री शिर्के, गुरू अमला शेखर आणि आचार्य डॉ. नीलिमा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे भारतीय शास्त्रीय कलेचा वारसा जतन करण्यास आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले. तीनही गुरूंनी प्रभा मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वेदांती भागवत महाडिक लिखित ‘कथकशास्त्र’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×