मस्साजोग ग्रामपंचायतची पोटनिवडणूक काही तासांवर; उमेदवारांकडून प्रचाराला वेग

मस्साजोग ग्रामपंचायतची पोटनिवडणूक काही तासांवर; उमेदवारांकडून प्रचाराला वेग

उमेदवारांकडून आरोप- प्रत्यारोप जोरात; कोण उधळणार गुलाल, राज्याचे लक्ष

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोग ग्रामपंचायतची सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गावामध्ये प्रचाराचे वारे जोराने वाहत असून उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणूकीत जनसेवा ग्रामविकास पॅनल कडून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख तर दुसरीकडे परिवर्तन ग्राम विकास पॅनलकडून स्वरूपानंद देशमुख यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन – सविस्तर बातमी 

गावच्या सरपंच पदासाठी कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे गावांमधील नागरिकांना मध्ये नेमकं मतदान कोणाला करायचे ? असे प्रश्न निर्माण होऊन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी रिंगणात उतरल्यामुळे त्यांना निवडून देऊन दिवंगत संतोष देशमुख यांचे राहिलेले विकास कामाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वर्गीय देशमुखांना आदरांजली अर्पण करायची का? मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांना निवडून देणार का ? असे सवाल गावातील मतदारांमध्ये उपस्थित होत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गुलाल कुणाला लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काय म्हणाले स्वारुपानंद देशमुख

कारागृहातील पहिली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यामध्ये असे दाखवले होते की वाल्मिक कराडची गॅंग कारागृहातील कायद्याला कसा त्रास देत आहे त्याच्यानंतर ज्या माणसाची ती ऑडिओ क्लिप होती , त्यांच्या दुसऱ्या दिवशी परत एक ऑडिओ क्लिप वायरल आली. यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही किंवा त्याच्यामध्ये बळजबरी करून व पोलीस प्रशासनातील लोकं आहेत. त्यांच्यावर दबाव टाकून मस्साजोगची निवडणूक लागली आहे. तिथे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी उभे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला वाल्मीक कराडच्या गॅंग ची बदनामी करायची अशी क्लिप आली त्यामुळे तशा प्रकारची पत्र सुद्धा जेल प्रशासनाला दिले आहे. लोकांच्या काय मूलभूत सुविधा असतात रस्ता, पाणी, वीज, आणि निवारा ह्या ज्या चार-पाच गोष्टी आहेत. या गोष्टींना सामोरे जाऊन तुम्ही लोकांना मतदान मागायला पाहिजे. परंतु जेलच्या लोकांना धमकी टाकून त्यांच्यावर दबाव आणून कुठल्यातरी एका समाजाला बदनाम करायला लावणं किंवा कुठल्यातरी एका गोष्टीचा ववाव पूर्व करून त्याची सहानुभूती तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये घ्यायची असेल तर ही गोष्ट कुठेतरी फार चुकीची आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×