Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कुख्यात निलेश घायवळ टोळीतील दोन गुन्हेगार अटकेत

कोथरूड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात निलेश घायवळ टोळीतील दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. संबंधित आरोपी मोक्‍काच्‍या गुन्‍ह्यात ते फरार होते. त्यांना ३१ डिसेंबरला पेट्रोलिंगदरम्यान अटक करण्यात आली. मनीष रामकृष्ण माथवड (वय २८, रा. शोभा संकुल अपार्टमेंट, गणेश कॉलनी, कोथरूड) आणि चिक्या उर्फ ओंकार शाम फाटक (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) अशी अटक केलेल्‍या दोघांची नावे आहेत.

गर्दीचा फायदा घेउन महिलांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी

दोघेही आरोपी निलेश घायवळ टोळीतील साथीदार असून कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार विष्णू राठोड व आकाश वाल्मिकी यांना आरोपी कोथरूड परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या आधारे पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्यासह पथकाने ३१ डिसेंबरला सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्‍त शीतल जानवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल माने, मयूर पांढरे व प्रवीण मांडवकर यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×