Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसरमधील भेकराईनगर परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन वसंत कांबळे (रा. भीमदीप वसाहत, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांबळे यांचे भाऊ सचिन (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\

रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे हे १६ फेब्रुवारीला सकाळी अकराच्या सुमारास बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या कांबळे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कांबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम चंद्रकांत माने (वय २३, रा. गोविंदनगर, वाखरी विसावा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत शिवम याचा भाऊ शुभम (वय २५) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवम हा बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागातून निघाला होता. त्या वेळी भेकराईनगरमधील शिवशक्ती चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार शिवम याला धडक दिली. अपघातात शिवम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×