Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती रविवार पेठेतील एका दुकानात खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरावर डंपर आदळून महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महात्मा फुले पेठेत राहायला आहेत. त्या रविवार पेठेत १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बहिणीसह खरेदीसाठी आल्या होत्या. एका दुकानात त्या खरेदी करत होत्या. त्यावेळी त्यांच्या पिशवीतून चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोकड असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.

शहराच्या मध्य भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात महिलांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×