Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

घरावर डंपर आदळून महिलेचा मृत्यू

घरावर डंपर आदळून महिलेचा मृत्यू

मुळशी तालुक्यातील कातरखडक गावातील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर डंपर आदळल्याची घटना गुरुवारी सकाळी मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात घडली. या घटनेत ५० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा मालपोटे (वय ५०, रा. कातरखडक, ता. मुळशी जि. पुणे ) असे मृत्यमुुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मालपोटे यांच्या मुलाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोहगाव परिसरात गोदामाला आग; साहित्य जळून खाक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यात वर्तुळाकार मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी वाळू घेऊन निघालेल्या डंपर चालकाचे कातरखडक गावातील वळणावर नियंत्रण सुटले. वळणावर मालपोटे यांचे घर आहे. डंपर थेट घरात शिरला. डंपरच्या धडकेत भिंत कोसळली. राडारोड्याखाली दबल्याने मालपोटे यांच्यासह आणखी महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राडारोड्याखाली अडकलेल्या मालपोटे यांच्यासह एका महिलेला बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मालपोटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×