Breking News
फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूकराँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभडेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटकबालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणारशासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूकपुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटलीअल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटनावाहतूक नियमन करा, कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवाहिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

डेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटक

कॅफेत हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे रक्त धुवून टाकले

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या फ्लाईंग जिप्सी हॉटेलच्या मालकासह दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनेनंतर संबंधित हाॅटेल मालकांनी सांडलेले रक्त धुवून टाकल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. हेमंत पाटील आणि प्रेम पाटील अशी अटक केलेल्या कॅफे मालकांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या एका हाॅटेलच्या आवारात रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणींसह ७ जणांना अटक करण्यात आली. तसेच, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. याघटनेची गंभीर दखल डेक्कन पोलिसांनी घेतली आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याजवळ (फर्ग्युसन रस्ता) असलेल्या संबंधित फ्लाईंग जिप्सी हाॅटेलविरुद्ध स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. मध्यरात्री आरडाओरडा, तरुणांकडून मद्यप्राशन करुन गोंधळ घालण्याचे प्रकार या भागात घडले होते.

या भागातील स्थानिकांनी पोलिसांनी चित्रफीत दिली होती. बंगल्याच्या आवारात हाॅटेल सुरू करुन महापालिकेच्या नियमावलीचे उल्लंघन करणे, मध्यरात्रीपर्यंत हाॅटेल सुरू ठेवणे, रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कारवाई केल्यास दाद न देणे, अरेरावी करणे असे प्रकार संबंधित हाॅटेल चालकाने केले आहेत. यापूर्वी हाॅटेल मालकासह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. कारवाईला न जुमणाऱ्या हाॅटेल चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

याप्रकरणातील जखमी तरुण आणि एक तरुणी हे दोघे ‘रीलस्टार’ आहेत. साताऱ्यातील कासपठार येथे मोटार पुढे नेण्याच्या कारणावरून (ओव्हरटेक) त्यांच्यात वाद झाला होता. गेले वर्षभर त्यांच्यात वाद सुरू होते. १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री या प्रकरणात जखमी झालेला तरुण डेक्कन जिमखाना भागातील हाॅटेलमध्ये आला होता. त्यावेळी रीलस्टार तरुणीने साथीदारांना बोलावून घेतले. तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच, एकाने तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

कॅफे मालकांनी रक्त पाण्याने धुतल्याचे तपासात उघडकीस

फ्लाईंग जिप्सीमधे रिल्स स्टारवर कोयत्याने वार झाल्यानंतर हाँटेलचे मालक हेमंत पाटील आणि प्रेम पाटील यांनी कँफेमधे घटनास्थळी सांडलेले रक्त पाण्याने धुतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×