Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दुचाकी चोर अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोहगाव पोलिस ठाण्याची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील लोहगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. साहिल सोनिया सियान (वय २८, रा. खंडोबा माळ, लोहगाव) असे आरोपीचे नाव आहे.

प्रांत अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगत ३ लाख ७० हजारांना फसवले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीप्रकरणी ५ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून एकजण चोरीच्या दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आणखी एक दुचाकी चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी लोहगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, उपनिरीक्षक मनोज बरुरे, गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×