Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

विकसित भारतासाठी तंत्रज्ञान व बांधकाम क्षेत्राचे मोलाचे योगदान

कुलगुरू डाॅ. सुनील भिरूड यांचे प्रतिपादन – ‘बीएआय’तर्फे ‘बिल्डर्स डे’निमित्त ‘विकसित भारत २०४७’वर ज्ञानसत्र

marathinews24.com

पुणे – अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी निवाऱ्याची महत्त्वाची गरज जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचेल, तेव्हा विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार आहे,” असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुनील भिरूड यांनी केले.

वनराई इको क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न – सविस्तर बातमी

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे सेंटरतर्फे ‘बिल्डर्स डे’ निमित्त ‘विकसित भारत २०४७: बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान’ या विषयावरील ज्ञानसत्रात डॉ. भिरूड बोलत होते. हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार व वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर, बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष महेश मायदेव, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, कोषाध्यक्ष डाॅ. महेश राठी, कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी उपस्थित होते.

डाॅ. सुनील भिरूड म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असून, २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना, अंतराळप्रवास आणि मंगळ, चंद्र येथील मानवी वसाहतींचा विचार केला जाईल. अधिकाधिक स्मार्ट साधने, स्मार्ट सामग्री असेल. बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होत जाईल. बांधकाम क्षेत्राची भूमिका अनन्यसाधारण महत्त्वाची राहील, हे निश्चित आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राने सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता जपावी. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी ‘बीएआय’ करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.”

अनुभव कपूर म्हणाले, “विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी दरडोई उत्पन्न, सामाजिक सुधारणा, शाश्वत पर्यावरणीय उपाययोजना आणि प्रभावी शासकीय यंत्रणा हे चार घटक महत्त्वाचे आहेत. त्याची अंमलबजावणी जेवढी कार्यक्षमतेने होईल, तितका विकासाचा आलेख उंचावत जाईल. शहरीकरणाचा वेग वाढल्याने स्मार्ट शहरे वाढतील. सर्व क्षेत्रांत गतिमानता येईल. सातत्याने नव्या आणि कार्यक्षम नागरी सुविधांची गरज वाढेल आणि त्यात बांधकाम क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल.”

यावेळी ‘बीएआय’च्या वतीने बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे, लक्ष्मण थिटे, एस. बी. थोरवे, युसुफ इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संजय बोरकर, गीता नगरकर, अधीरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एसकेएफजी रिअलिटी लिमिटेड, विंडसर इन्फ्राकाॅन व जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले. ‘बीएआय’च्या नवीन डायरीचे प्रकाशन झाले.

‘बीएआय’ बांधकाम व्यावसायिक, बांधकाम कामगार व त्यांचे मुले यांच्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे अजय गुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले. लक्ष्मण थिटे, अशोक केडगे यांनी मनोगत मांडले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×