Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

केजमधील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

कार्यालयात उशिरा येणे, गैरहजेरी, पलायन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून केला निषेध

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – केज पंचायत समिती कार्यालयातील अनियमित उपस्थिती बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॅान्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष देणार का? आणि कार्यालयात सतत गैरहजर राहून कामचुकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कडून गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

हडपसरमध्ये कालव्यात ढकलून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

कार्यालयातील गैरशिस्तीचा निषेध म्हणून अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. काही कर्मचारी सातत्याने उशिरा येतात, तर काही पूर्णतः गैरहजर राहत असल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच काही कर्मचारी फक्त एकदाच येऊन हजेरी रजिस्टरवर सही करून उपस्थिती दाखवून पुन्हा कार्यालयातून निघून जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मानसिक व नाहक,आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

शासकीय कार्यालयातील शिस्त, वेळेचे पालन व जबाबदारी यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अनियमिततेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला. पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीने लागू करावी, बायोमेट्रिकशिवाय कोणतीही उपस्थिती ग्राह्य धरू नये, वेळेचे पालन न करणाऱ्या व गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच गटविकास अधिकारी यांचे ड्युटी शेड्युल कार्यालयाबाहेर वारानुसार प्रदर्शित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचित कडून यावेळी देण्यात आला. तरी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×