Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

जिल्ह्यात तालुकास्तरावर महसूल दिन व सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात तालुकास्तरावर महसूल दिन व सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात तालुकास्तरावर महसूल दिन व सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी १ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात करण्यात आला. तसेच यावर्षी महसूल दिनापासून १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. याअंतर्गत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

या सप्ताहानुसार जुन्नर येथे निवासी नायब तहसीलदार सारिका रासकर यांच्या हस्ते महसूल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला तसेच त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ, आस्थापना विषयक कामकाजही करण्यात आले. मुळशी येथे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या अध्यक्षतेखाली व उप अधीक्षक भूमी अभिलेख मुळशी स्वप्ना पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती मुळशी येथे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड व इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

बारामती येथे आजी, माजी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला. तसेच भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले रवींद्र जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर यथे पुरवठा विभागाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा संवाद आयोजित करण्यात आला.

पुरंदर येथे उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना तहसिलदार यांचे हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. दौंड येथे महसूल सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेऊन अडचणींचे निराकरण करणे तसेच सेवापुस्तके अद्यावत करणे व e HRMS प्रणालीवर माहिती अद्यावत करणे या बाबींचे नियोजन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×