Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

अल्पवयीनाकडून मौजमजेसाठी वाहन चोरी

अल्पवयीनाकडून मौजमजेसाठी वाहन चोरी

दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. चोरट्याकडून एक दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. वारजे भागातीाल रामनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

अल्पवयीनाने सहकारनगर परिसरातून रिक्षा चोरली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील माेकळ्या जागेत थांबला होता. त्याच्याकडे असलेली रिक्षा चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. अल्पवयीनाने सहकारनगर, वारजे, हडपसर परिसरातून एक दुचाकी, दोन रिक्षा चाेरल्याचे उघड झाले.

त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, वर्षा कावडे, पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, नारायण बनकर, प्रदीप राढोट, निनाद माने यांनी ही कामगिरी केली.

दागिने हिसकावणारा गजाआड

महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने गजाआड केले. चोरट्याकडून मोटार, मोबाइल असा १५ हजारांचाा ऐवज जप्त करण्यात आला. सुनील रावण शिंदे (वय २९, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिंदे याने सहकारनगर भागात एका महिलेचे दागिने हिसकाविले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून समांतर तपास करण्यात येत होता. तपासात शिंदे याने महिलेकडील दागिने हिसकाविल्याची माहिती धनंजय ताजणे, रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके यांना मिळाली. शिंदे शनिवार पेठेतील नदीपात्रातील रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मोटार आणि मोबाइल जप्त करण्यात आला. चौकशीत शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांनी महिलेकडील दागिने हिसकावण्याचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला तपाससाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×