Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

क्रीडा क्षेत्रावर शोककळा; मंगळवारी खराडी येथे अंत्यसंस्कार

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ कुस्तीसंघटक, मल्लांचे आश्रयदाते म्हणून ओळख असलेले तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांचे सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात लाचखोरीच्या घटनांवर पोलीस आयुक्तांची नाराजी – सविस्तर बातमी

अण्णासाहेब पठारे यांनी कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. तळागाळातील कार्यकर्ते, खेळाडू आणि विविध क्रीडा स्पर्धांना त्यांनी नेहमीच आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. अनेक नामवंत पैलवानांचे ते मार्गदर्शक व आश्रयदाते म्हणून परिचित होते.
ते हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, माजी संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना, तसेच खराडी गावचे माजी सरपंच होते. आमदार बापूसाहेब पठारे यांचे ते थोरले बंधू असून माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांचे वडील तसेच नगरसेवक सुरेंद्र पठारे यांचे चुलते होत.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार, मित्रपरिवार व असंख्य कार्यकर्ते असा परिवार आहे. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता खराडी गाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×