तिघेजण ताब्यात
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून अल्पवयीनांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना वाघोलीजवळील वढू गावात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. दत्तनगर, कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विकासकुमारचा मोठा भाऊ आhकाशकुमार (वय २३) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन अल्पवीयानांना ताब्यात घेण्यात आले.
पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. विकासकुमार याचा पाच दिवसांपूर्वी अल्पवयीनांशी वाद झाला होता. वादातून १४ ऑक्टोबर रोजी अल्पवयीनांनी त्याच्यावर शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना लोणीकंद परिसरातील वढू खुर्द गावात असलेल्या आमदारनगर परिसरात घडली. अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीच्या परिसरात मृतदेह सापडल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणावर शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त अबिनाशकुमार, सहायक आयुक्त अनिता माेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून अल्पवयीनांनी विकासकुमार याचा खून केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करत आहेत.
भारती विद्यापीठ परिसरात अल्पवयीनाचा खुनाचा प्रयत्न
किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. याबाबत एका अल्पवयीनाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रेम लखन वाळवकर (वय १९, रा. टेल्को काॅलनी, दत्तनगर, आंबेगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन आणि त्याचा मित्र हे रात्री दहाच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागानगर परिसरातून निघाले होते. एकमेकांकडे बघण्याच्या वादातून आराेपी वाळलकर आणि अल्पवयीनाने तक्रारदार अल्पवयीनावर शस्त्राने वार केले. अल्पवयीनाबरोबर असलेल्या मित्रावर वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.




















