Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली माहिती 

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: जिल्हा परिषदेअंतर्गत १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची प्रारुप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ww.pune.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुण्यात नव्याने ५ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव – सविस्तर बातमी 

या प्रारुप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत. अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×