आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा

हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक

marathinews24.com

पुणे – आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत टोळक्याने रामटेकडी परिसरात राडा घातला. हातात शस्त्रे नाचवित, दगड गोटे फेकून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यासोबतच तरूणाला शस्त्राने मारहाण करीत दोन महिलांना दगडाने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी एका आरोपी वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर परिसरातील रामटेकडीत घडली आहे.

विरूद्ध दिशेने डंपर चालवून दुचाकीस्वाराला चिरडले – सविस्तर बातमी

महेश विकास शिंदे (वय २० रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रेम उर्फ पिटर्‍या थोरात (वय २१) दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड (वय १८) अरविंद उर्फ नक्या माने (वय १८) नितीन पाटोळे (वय १८) ओंकार देढे (वय २०) चेतन बावरी (वय १९ सर्व रा. रामटेकडी, हडपसर ) यांच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलावती सतीश देडगे (वय ५०) आणि अनिता विश्वजीत ठोसर (वय ३८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. संतोष छबुराव सुपेकर (वय ४५ रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर वय २२ हे ३१ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी परिसरात बोलत थांबले होते. त्यावेळी ८ ते १० जणांचे टोळके त्याठिकाणी हातात शस्त्रे, दगडगोटे घेउन आले. त्यांनी परिसरात दगडफेक करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यानंतर टोळक्याने संतोषला अडवून तू प्रण्याबरोबर का फिरतोस अशी विचारणा केली. टोळक्याने संतोषला शस्त्राने आणि दगडानेही मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत, अशी धमकी देउन परिसरात पुन्हा दगडफेक केली. त्यानंतर हातातील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली.

त्यानंतर नीलावती आणि अनिता यांच्यावर दगडफेक करीत त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×