Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

विरूद्ध दिशेने डंपर चालवून दुचाकीस्वाराला चिरडले

गुलटेकडीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

येरवड्यातील अपघात

marathinews24.com

पुणे – विरूद्ध दिशेने डंपर चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात १ जूनला सकाळी पावणे अकराच्या सुमारास येरवड्यातील शास्त्री चौक ते गुंजन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर घडला आहे. तन्वीर आलमयार खान (वय ३१ रा.न्यूओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अनिल रामसिरीठ सिंग (वय ४६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) या डंपर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्ता यार खान (वय ३४, रा. .न्यूओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील हडपसर, सहकारनगरमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचालक अनिल सिंग हा १ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास येरवड्यातील शास्त्री चौक ते गुंजन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर विरूद्ध दिशेने जात होता. त्यावेळी त्याने दुचाकीस्वार तन्वीरला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तन्वीरचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून डंपर चालकांनी दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात आहे. बेदरकारपणे वाहन चालवित नियमभंग करणार्‍या डंपर चालकांसह अवजड वाहन चालकांना शिस्तच नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांच्या वाहनांना सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास शहरात बंदी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अपघात प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×