Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार

पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – धावत्या बसमध्ये पीएमपी वाहक महिलेवर प्रवासी तरुणाने चाकूने वार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८, सध्या रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भालेराव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अतिक्रमण कारवाई करणाऱ्या निरीक्षकाला धक्काबुक्की – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एुप्रिल राेजी महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाली होती. त्यावेळी भालेराव प्रवाशांचे तिकीट काढण्याचे काम करत होत्या. त्यावेळी प्रवासी तरुणाला त्यांनी तिकिट काढण्यास सांगितले. या कारणावरुन प्रवासी तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. या कारणावरुन प्रवासी तरुणाने त्यांच्या मांडीवर चाकूने वार केला. त्यानंतर प्रवासी तरुण बसमधून उडी मारुन पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत असून, पाेलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×