सहकारनगर २ येथील तुळशीबाग कॉलनीवाले येथील मानसी अपार्टमेंट जवळील घटना
marathinews24.com
पुणे – किरणा स्टोअरमध्ये सामान खरेदीसाठी निघालेल्या गृहीणीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेली. हा प्रकार सहकारनगर २ येथील तुळशीबाग कॉलनीवाले येथील मानसी अपार्टमेंट समोर घडली. यावेळी महिलेची ४० हजारांची सोनसाखळी चोरून नेण्यात आली. याबाबत श्रृती उमेश जाधव (३५, रा. चिंतामणी अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
बायकोला शिवीगाळ केली, अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
तक्रारदार श्रृती १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास श्रध्दा हॉस्पीटल जवळ असलेल्या अंबिका किराणामालाच्या दुकानात चालल्या होत्या. त्यावेळी त्या मानसी अपार्टमेंट येथे आले असता मोपेड दुचाकीवर मास्क लावून आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यापैकी मागे बसलेल्या एकाने अचानक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. काही कळण्याच्या आतच चोरटे दुचाकीवर गजानन महाराज मठाच्या दिशेने निघुन गेले. या घटनेमुळे श्रृती या घाबरल्या. त्यांनी याबाबत लागलीच पतीला कळवले. परंतु, घरी लहान मुली असल्याने पोलिसांना सांगून त्यांनी दुसर्या दिवशी तक्रार दिली.
हिंगणे खुर्द, कोंढव्यात घरफोडी
पुणे-सिंहगडरोड येथील आनंद विहार येथील शिवनेरीमधील एका घराचे लॅच तर तळमजल्यावरील ब्युटीपार्लरचे कुलुप तोडून चोरटयाने ४ हजारांची रोकड चोरी करून नेली. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० वाजता घडला. याबाबत किरण सुदामराव पेडगावकर (४८, रा. आनंदविहार कॉलनी, हिंगणे खुर्द) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढव्यात काकडेवस्ती येथे अत्तर हाईट्समधील सदनिकेचा दरवाजा उघडून दोन अनोळखी मुलांनी लोखंडी कपाटातील १ लाख २० हजारांची रोकड चोरी करून नेली. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सुचेंद्र चोखंद्रे (३२, अत्तर हाईट्स, काकडेवस्ती, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विचारणा केल्याने दगडाने मारहाण
पुणे-प्लॉटमध्ये टाकेला राडारोडा काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून दगडाने व लाकडी बांबुने मारहाण केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात आरोपीसह त्याच्या पत्नीवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला. फिर्यादी यांचा न्यु सिटी शेजारील रिकाम्या जागेत प्लॉट आहे. आरोपीने त्या जागेत राडारोडा टाकल्याने त्यास तो काढण्यास सांगितला असता त्याचा राग येऊन त्याने मिलिंद भोरडे यांच्या डोक्यात दगड फेकुन मारहाण व नंतर आरोपीच्या पत्नीने लाकडी बांबु आरोपीच्या हतात देऊन त्यांना मारा असे म्हणाल्या. यावेळी आरोपीने त्यांच्या पायावर मांडीवर व उजव्या हातावर मारून हाताचे हाड फ्रॅक्चर केले.
ज्येष्ठावर हत्याराने वार
घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला येरवड्यातील यशवंतनगर येथील डायमंड चौक येथे तीन ते चार जण आपआपसात वाद घालत असताना दिसले. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्याच्यावरच धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमन अनिल भालेराव (रा. यशवंतनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश रामचंद्र साबळे (६३, रा. डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीचे कपडे बदलनाताचे फोटो मोबाईमध्ये काढून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ती घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन अकरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय चिंदांबरम कुलकर्णी (४४, रा. सुर्या चौक, आंबेगाव पठार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१९ ते जुलै २०२५ दरम्यान घडला. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त स्नेहल थोरात करत आहेत.





















