Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

सहकारनगर भागात महिलेचे दागिने हिसकावले

सहकारनगर भागात महिलेचे दागिने हिसकावले

चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायकोला शिवीगाळ केली, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तुळशीबागवाले काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तुळशीबागवाले काॅलनीतून निघाल्या होत्या. या भागताील ढोमकर पथ परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी ज्येष्ठ महिलांकडे पोलीस असल्याची बतावणी, तसेच मोफत साडीवाटप करण्यात येत असल्याचे आमिष दाखवून चोरटे त्यांच्याकडील दागिने लांबवून पसार होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

पीएमपी प्रवासी महिलांकडील एक लाखांचा ऐवज लंपास

पीएमपी प्रवासी महिलांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम आहे. कर्वे रस्ता परिसरातील पीएमपी थांब्यावर बसमध्ये प्रवेश करताना एका ज्येष्ट महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेच्या पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला मूळच्या अहिल्यानगरमधील आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. कर्वे रस्त्यावरील पीएमपी थांब्यावर त्या थांबल्या होत्या. त्या वेळी बसमध्ये प्रवेश करताना महिलेच्या हाताताील सोन्यााची बांगडी चोरट्यांनी कटरचा वापर करुन लांबविली. सहायक फौजदार गमाले तपास करत आहेत.

स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात एका महिलेच्या पिशवीतून ३३ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगावमधील खेसे आळीत राहायला आहेत. त्या स्वारगेट स्थानकातून पीएमपी बसमधून ७ ऑगस्ट रोजी निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या पिशवीतून रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर भागातील पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये प्रवेश करुन चोरटे ऐवज लांबवितात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×