Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

ब्युटी पार्लरमधून महिलेचे दागिने लंपास

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ब्युटी पार्लरमधून एका महिलेचे ६० हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना कोंढव्यातील उंड्री परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात घरपोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. उंड्री परिसरात असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्या गेल्या होत्या. ब्युटी पार्लरमधील महिलेला त्यांनी फेशिअल करण्यास सांगितले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने एका वाटीत काढून ठेवले होते. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून वाटीतील दागिने लांबविण्यात आले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत चाटे तपास करत आहेत.

पादचारी ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली

पुणे – पादचारी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील वैदुवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. ते १९ नाेव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास हडपसरमधील वैदुवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चाेरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×