Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान

प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान

प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ ‘गंधार रंजन 2026’ मधून संगीताचा सुरेल नजराणा

marathinews24.com

पुणे – कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासन, दुर्गम प्रतिष्ठान, उत्कर्ष महिला मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या सहकार्याने प्रख्यात शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व ‘स्वरगंध’ प्रस्तुत ‘गंधार रंजन 2026’ हा संगीत कार्यक्रम भारत नाट्य मंदिर येथे उत्साहात पार पडला.

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने होते. त्यांच्या हस्ते तसेच भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरचे मिलिंद तलाठी यांच्या उपस्थितीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासनचे अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे, दुर्गम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार जाधव, उत्कर्ष महिला मंडळ व आधार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, रवींद्र पठारे, प्रतिशिर्डी संस्थानचे विश्वस्त रवी जाधव, नीलम खंडागळे, सविता काळोखे, उल्हास कदम, अशोक जाधव, पुरन हुडके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माणिक वर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या रत्नप्रभा गिरे (सांप्रदायिक कार्य), लता जाधव (चित्रपट निर्मिती), सुनंदा मोरे (सामाजिक कार्य), हेमा टाकळीकर (पाककला प्रशिक्षिका), विद्या ताम्हणकर (पुणेरी सुगरण संस्था), स्वाती शेठ (सामाजिक कार्य), विभावरी जाधव (अध्यक्षा, प्रतीशिर्डी संस्थान), ईशा पठारे (राज्यस्तरीय खेळाडू), कल्याणी कदम (महिला मंच) आणि विजया झेंडे (बाल संगोपन केंद्र) यांचा सन्मान करण्यात आला. प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्य साधून चार सामाजिक संस्थेने दिलेले पुरस्कार ऊर्जा देणारे आहेत. आमच्या क्षेत्रात काम करण्यास आणखी बळ मिळाले असल्याचे यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रसाद खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप काळोखे यांनी केले. नंदकुमार जाधव यांनी आभार मानले.

यानंतर ‘गंधार रंजन 2026’ या कार्यक्रमात दोन गंधारांचा प्रयोग असलेल्या रागांच्या बंदिशी, नाट्यगीते आणि भक्तिगीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. गायिका डॉ. राजश्री महाजन आणि गायक सोमनाथ जायदे यांनी ‘लाविते मी निरांजन त्या सावळ्या तनूचे’, कौसल्येचा राम, वृंदावनात माझ्या, एक धागा सुखचा, जाने कहाँ, कही दीप जले ही गीतांसह जाग, शिवरंजनी, तराणा, मिश्र किरवाणी व भैरवीची रचना त्यांनी सादर केली. कौसल्येचा राम हे व्हायोलिन व हार्मोनियमवर माधवी करंदीकर व डॉ. नीलिमा राडकर यांनी सादर करुन प्रक्षेकांचे मने जिंकली. कार्यक्रमात माणिक वर्मा यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संगीत प्रवास उलगडण्यात आला. त्यांना अभिजित जायदे (तबला), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन) आणि माधवी करंदीकर (हार्मोनियम) यांची साथसंगत लाभली. यशश्री पुणेकर यांनी निवेदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×