तरुणावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला गोळी झाडण्याचा प्रयत्न फसला; पिस्तूल झाले बंद
Marathinews24.com
पुणे- तरूणावर धारदार हत्यारांनी पाच ते सात वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री डायसप्लॉट जवळ महर्षीनगर आगाशे शाळेसमोर घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बाळा उर्फ राहुल ढोले असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिस्तुल लॉक झाल्याने त्यातून गोळी उडू शकली नाही. त्यानंतर नागरिकांची गर्दी जमा झाली.
नागरिकांनी जखमी बाळा याला रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी वार केले याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.