खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात नशेत तरूणाच्या अंगावर चढविली मोटार, आरोपी अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवली. गुु्रपमध्ये अॅड करून घेत त्यांना अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे नफा दर्शवून सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला गुंतवणूक करण्यास सांगितले. तब्बल १७ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.





















