Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

दारू पितााना झालेल्या वादातून तरुणाचा खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दारू पिताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका अल्पवयीना ताब्यात घेण्यात आले. लोकेश मानसिंग ठोंबरे (वय ३०, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रदीप पांडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश आणि अल्पवयीन आरोपी हे मित्र आहेत. गुुरुवारी (७ मे) दुपारी दोघे जण घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत दारू पित होते. त्या वेळी त्यांच्यात वाद झाले. वादातून अल्पवयीनाने ठोंबरे याच्या डाेक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत.

सोमवार पेठ पोलीस वसाहतीत घरफोडी

पुणे-सोमवार पेठेतील पाेलीस वसाहतीतील घरातून चोरट्यांनी सात लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक पाचमध्ये तक्रारदार महिला राहायला आहे. चोरट्यांनी घराचा दरवाजा बंद असताना आत प्रवेश केला. कपाटातून सात लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस वसाहतीतील घरातून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरटा माहितगार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×