Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

डेटिंग ॲपद्वारे बोलवून घेत तरुणाला लुटले

कोढव्यातील घटना, ४ जणांना अटक

marathinews24.com

पुणे – डेटिंग ॲपद्वारे ओळख झाल्‍यानंतर तरुणाला भेटण्यासाठी बोलवून हत्‍याराचा धाक दाखवून लुटल्‍याचा धक्‍कादायक प्रकार कोंढव्यातील कौसरबाग येथील पारगेनगर येथे घडला. यावेळी तरूणाकडील सोन्या-चांदीचे दागिने अन १० हजारांची रक्‍कम ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली. याप्रकरणी दोन व्यक्‍तींवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. जबरदस्तीने लुटून नेणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

कामगारांना लुटणार्‍या टोळीला दोन तासात अटक – सविस्तर बातमी

राहील अकिल शेख (वय १९, रा. सोमजी डी मार्ट पाठीमागे, कोंढवा), शाहिद शानुर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), रोहन नईम शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा), ईशान निसार शेख (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांनी अशाच पद्धतीने आणखी दोघा तरुणांना लुबाडल्याचे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. विशाल (वय २४, रा. पिसोळी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विशाल हे वाकडमधील कंपनीत कामाला आहेत. २८ डिसेंबरला विशालला सुटी असल्याने तो मोबाईलवर ग्रिन्डर डेटींग साईट पाहत होता. त्‍याला ॲपवरील टॉप नावाच्‍या आयडीवरून त्‍याला मेसेज आला. त्‍यानंतर संबंधीत व्यक्‍तीशी बोलणे झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी कोंढव्यात बोलवले. कौसरबागेतील ममता स्विट्स या दुकानाजवळ आरोपीने त्‍याला बोलवले. त्‍यानुसार तक्रारदार तेथे गेल्यानंतर तरूणाला व्हॉट्सॲप कॉल करून त्‍याला आणखी पुढे येण्यास सांगितले. त्‍यावेळी तक्रारदाराने अधिक पुढे जाण्यास नकार दिला.

काही वेळात दोन तरूण विशालच्‍या जवळ आले. त्याला थोडे पुढे गेल्‍यानंतर दोघातील एकाने धारदार हत्‍याराचा धाक विशालला दाखवून त्‍याच्‍या युपीआय आयडीवरून रक्‍कम ट्रान्सफर करण्यात सांगितले. परंतु मोबाईलमध्ये पैसे नसल्‍याने आरोपींनी मित्रांकडून पैसे मागविण्यास सांगितले. तीन मित्रांनी पैसे पाठवले. त्‍यानंतर आरोपींनी रक्‍कम ट्रान्सफर करून घेतली. मोबाईल व सोन्या-चांदीचे दागिनेही हिसकाऊन घेतले. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

आणखी दोन प्रकार उघडकीस

तरुण ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवरुन जात होते. वाटेत कौसरबाग येथे लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी या चौघांनी त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यांच्याकडील मोबाईल हिसकावुन घेतला. त्यांच्याकडे १० हजार
रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडे फक्त एक हजार रुपये होते. त्यांना पैसे मागविण्यास सांगितले. मागिवलेले १० हजार रुपये व मोबाईल असा ३० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन घेतला होता. या तरुणानेही पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे या चौघांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यानंतर त्यांनी डेटिंग अ‍ॅप पाहणार्‍या वाघोली येथील २७ वर्षाच्या तरुणाला ११ जानेवारी रोजी शितल पेट्रोलपंपाजवळ बोलावून घेतले. तेथून त्याला पानसरेनगरमधील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कुलसमोरील मोकळ्या मैदानात नेले. तेथे आणखी दोघे जण आले. चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन दोघे जण पैसे काढायला गेले. त्यावेळी राहिल व त्याच्या सोबत असलेल्याने त्यांच्या बोटातील २ अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, चांदीची अंगठी काढून घेतले. एटीएममधून १० हजार ५०० रुपये काढून घेऊन दोघे जण आले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन ते चौघे पळून गेले. या तरुणाचा ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×