Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

तरूणाच्या डोक्यात वार करून मनगट तोडले

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

लोहियानगरमधील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – हातउसने दिलेले पैसे माघारी देण्याची बतावणी करीत टोळक्याने तरूणाला बोलावून घेत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. त्याच्या डोक्यात वार करून मनगटापासून अर्धा हात तोडल्याची घटना २७ एप्रिलला रात्री एकच्या सुमारास गंजपेठेतील लोहियानगरात घडली आहे. याप्रकरणी दोघाजणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. जहॉगीर युनूस काझी (वय ४४, रा. मोमिनपुरा) आणि सागर धनाजी थोरात (वय ३६ रा. लोहियानगर )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात महिलेला चांगल्या परताव्याचे आमिष पडले सव्वा दोन कोटींना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा घोरपडी पेठेत राहायला असून, हातउसने दिलेले पैसे परत देतो अशी बतावणी करून दोघांनी त्याला बोलावून घेतले. २७ एप्रिलला रात्री एकच्या सुमारास हल्लेखोरांनी तक्रारदाराला टिंबर मार्वेâट परिसरात बोलावले. त्याठिकाणी त्याला शिवीगाळ करून धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात वार केला. त्यानंतर त्याच्या हाताच्या मनगटावर वार केल्यामुळे तक्रारदाराच्या मनगटाचा अर्धा भाग तुटला आहे. हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करीत आहेत.

बिबवेवाडीत घरातून ९१ हजाराचे साहित्य चोरीला

फ्लॅटची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी मोबाइल, हेडफोन, घड्याळ असा मिळून ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ एप्रिलला सकाळी सात ते आठच्या सुमारास बिबवेवाडीतील रम्यनगरी हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण बिबवेवाडीतील रम्यनगरी हौसिंग सोसायटीत राहायला आहे. २७ एप्रिलला सकाळी सातच्या सुमारास त्याने फ्लॅटला बाहेरून कडी लावलेली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदार बाहेर गेला होता. नेमकी संधी साधून अज्ञात चोरट्याने कडी उघडून आतप्रवेश केला. घरातील मोबाइल, हेडफोन, घड्याळ असा मिळून ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला. बाहेरून आल्यानंतर तरूणाला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×