Breking News
कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचे मत; ‘सीवायडीए’तर्फे जागतिक युवा दिनी ‘ग्रीन युथ मुव्हमेंट’चे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – “भारताच्या लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. तरुणांनी ठरवले, तर ते काहीही करु शकतात. येत्या काळात तरुणांनी पर्यावरणाशी निगडीत समस्या लक्षात घेऊन सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पर्यावरण विषयात काम करायला हवे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दूत म्हणून काम करावे,” असे मत माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना वितरित – सविस्तर बातमी 

सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अ‍ॅक्टीव्हीटीज (सीवायडीए) यांच्यातर्फे जागतिक युवा दिनाच्या (१२ ऑगस्ट) निमित्ताने ‘ग्रीन युथ मूव्हमेंट’चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर तेरे देस होम्सच्या डॉ. नम्रता जैटली, नगरसेवक अ‍ॅड. अविनाश साळवे, नगरसेविका सुमय्या नदाफ, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अ‍ॅक्टीव्हीटीजचे संस्थापक संचालक मॅथ्यू मट्टम आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “शहरात पूर्वी भर उन्हाळ्यातही फॅनची गरज लागत नव्हती. आता मात्र एसीशिवाय बसवत नाही. आता थोडा पाऊस झाला, तरी शहरात पूरस्थिती निर्माण होते. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शहरांमध्ये कार्बन डायऑक्साईडडचे उत्सर्जन वाढत आहे. आता याकडे दुर्लक्ष केले, तर येणाऱ्या पिढीला दप्तरात वह्या-पुस्तकांसोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावे लागेल.”

अ‍ॅड. अविनाश साळवे म्हणाले, “देशाप्रती आणि समाजाप्रती प्रत्येकाचे उत्तरदायित्व आहे. आज ‘ग्रीन युथ मूव्हमेंट’च्या माध्यमातून युवाशक्ती पर्यावरण विषयात काम करण्यासाठी पुढे आली आहे. येत्या काळात आपण एकत्र मिळून कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयात काम करुया.”

मॅथ्यू मट्टम यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाची चळवळ सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना कचरा व्यवस्थापनाबाबत मानसिकता बदलल्याशिवाय भारत विकसित होणार नाही. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यावर काम करण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरेल, असे नमूद केले.

यावेळी या चळवळीची समन्वयक दिक्षा मेहेत्रे, नगरसेविका सुमय्या नदाफ आणि परमा नॅचरल्सच्या गीता प्रकाश यांनी मनोगत व्यक्त केले. देवेंद्र बनसोडे व आकांक्षा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा चलवादी हिने आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×