विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाला विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १७ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान याची समाज माध्यमातून युवतीशी ओळख झाली. त्याने युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारनंतर युवती गर्भवती राहिली. युवती नुकतीच प्रसृत झाली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बालपांडे तपास करत आहेत.
कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीनाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीनाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ती गर्भवती राहिली. ससून रुग्णालयात ती नुकतीच प्रसृत झाली. सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत.




















