‘अल्बम साँग’मध्ये काम देण्याचे आमिषाने तरुणीवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे -‘अल्बम साँग’मध्ये काम देण्याच्या आमिषाने माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कराडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पूर्वसूचना न देता काम; सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. ती परराज्यातील आहे. समाजमाध्यमातील एका समुहात ती सहभागी झाली होती. या समुहात नवाेदितांना चित्रपटात काम, तसेच अल्बम साॅंगमध्ये काम करण्याची संधी असा मजकूर तरुणाने प्रसारित केला होता. त्यानंतर तरुणीने तरुणाशी संपर्क साधला. आरोपीने तिला एका गीताचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या गीतात काम देण्याचे आमिष दाखवून तिला तरुणाने जाळ्यात ओढले. जून महिन्यात कराडला चित्रीकरण करण्यात येणार आहे, असे सांगून त्याने तिला तेथे नेले. तरुणाने धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

घटनेनंतर तरुणी पुण्यात आली. आरोपी तरुणाने पुन्हा तरुणीशी संपर्क साधला. त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केले. त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×