Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

नोकरीच्या आमिषाने तरुणींची ३० लाखांची फसवणूक

(Pune Cyber Crime)

भारती विद्यापीठ पोलिसांकडून गु्न्हा

marathinews24.com

पुणेCrime News : पोलीस, तसेच तलाठी पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने दोन तरुणींची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर सुखदेव जाधव (रा. महात्मा फुले पेठ, सध्या रा. चंद्रभागानगर, भारती विद्यापीठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्कीचा प्रकार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या आहीरे गावची रहिवासी आहे. तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती. एका परिचितामार्फत तिची आरोपी जाधव याच्याशी २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला पोलीस दलात भरतीचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन, तसेच रोख स्वरुपात ११ लाख १० हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. तरुणीने पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा जाधवने तिला एक लाख पाच हजार रुपये परत केले.

उर्वरित पैसे परत करण्याची मागणी तरुणीने त्याच्याकडे केली. तेव्हा त्याने तरुणीला उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
चौकशीत जाधवने अशाच पद्धतीने आणखी एका तरुणीची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एका तरुणीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्याने तिची २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित तरुणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जाधव याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्याने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांकडून महिलेला ७ लाखांचा गंडा

Crime News : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५८ वर्षीय महिला कोंढवा भागात राहायला आहे. जून महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतवाा मिळेल, असे अमािष चोरट्यांनी तिला दाखविले होते.

महिलेला एक ॲप मोबाइलमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले. त्यानंतर ॲपद्वारे शेअर खरेदी-विक्री व्यवहार करण्यात येईल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेला परतावा मिळविल्याचे भासविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात आणखी रकम गुंतविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×