Breking News
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादतब्बल ५ महिलांनी घेतला-बांगड्या अन मेहंदीचा आनंदस्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वनपुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करापार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणार्‍यांचा शोध सुरूतीन मित्रांच्या भोवतीचा पौर्णिमेचा फेरा उलगडणार की अजून गुंता वाढणार, ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ प्रदर्शित

पुण्यात भाजप पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुण्यात भाजप पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिला पोलीस अधिकार्‍याशी अश्लील वर्तन

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारीने वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याशी अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी (दि.२३ जून) पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी बंदोबस्तात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तरूणावर वार केला, अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला – सविस्तर बातमी 

महिला पोलीस अधिकार्‍याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी मार्गाचे पाहणी दौर्‍यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे २३ जूनला पुण्यात आले होते. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी भाजपचे कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास रासने कार्यकर्त्यांसोबत शनिवारवाडा परिसरात थांबले होते.

कार्यक्रम सुरू होण्यास वेळ असल्यामुळे रासने हे कार्यकर्त्यांसह कसबा पेठ चौकी परिसरात असलेल्या उपाहारगृहात चहा प्यायला गेले. त्यावेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याशेजारी उभे असताना कोंढरे यांनी अश्लील वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

कोंढरे यांनी याप्रकरणी जबाब नोंदविला असून, आमदार रासने यांनी मला चहा पिण्याचा आग्रह केला. माझ्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसोबत मी चहा प्यायला उपाहारगृहात गेले. त्यावेळी रासने आणि कार्यकर्ते उपाहारसमोर थांबल्यामुळे तेथे गर्दी झाली होती, असे महिला पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. प्रमोद कोंढरे हा माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. ही बाब मला खटकली होती. मात्र, बंदोबस्तास असल्याने मी दुर्लक्ष केले. चहा प्याल्यानंतर मी रासने यांच्याशी थोड्या वेळ चर्चा केली. तेथून जात असताना मला कोणीतरी अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे जाणवले.

मी मागे वळून पाहिले, तेव्हा ती व्यक्ती प्रमोद कोंढरे होती. त्या वेळी बंदोबस्तात असल्याने मी दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयातील बैठक पार पाडून मी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास गेले. बंदोबस्तात किळसवाणी घटना घडल्याने मी अस्वस्थ झाले होते. त्यानंतर मी कसबा पेठ पोलीस चौकी परिसरातील उपाहारगृह परिसरात गेले. तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांंनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा कोंढरे याने अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे चित्रीकरणात दिसून आले. बंदोबस्त आटोपल्यानंतर मी या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना या घटनेची माहिती दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी प्रमोद कोंढरे विरूद्धचे गुन्हे

धमकावून वर्गणी मागितल्याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध २०१५ मध्ये खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच २०१० आणि २०११ मध्ये कोंढरे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. डेक्कन पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top