Crime News : तरूणावर वार केला, अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला

व्यापाऱ्याला भीमाशंकरच्या जंगलात चाकूच्या धाकाने लुटले

चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Crime News : ओळखीतील तरूणावर हत्याराने वार करून त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल शितोळे (वय २३, रा. कात्रज) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू गोवेकर याच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकींसह रिक्षा चोरणार्‍याला अटक, ५ दुचाकी, रिक्षा जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राहूल शितोळे हे २२ जूनला रात्री दोनच्या सुमारास कोंढव्यातील ए.एस.प्रो गोदामात काम करीत होते. त्यावेळी आरोपी पप्पूसह इतर तिघांनी राहूलला गोदामात गाठले. पप्पूने त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर राहूलच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जखमी केले. याप्रकरणी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

मोटारचालकाला अडवून लुटले

Crime News : दुचाकीला कट का मारला, अशी बतावणी करीत चोरट्यांनी मोटार चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना २४ जूनला साडेबाराच्या सुमारास बोपोडी मेट्रो स्टेशनखाली घडली आहे. चोरट्यांनी मोटार चालकाच्या कानातील साडेनउ हजारांची कानातील बाळी चोरून नेली. याप्रकरणी उमेश पाटील (वय २७, रा. चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उमेश पाटील हे चिंचवडमधील रहिवाशी असून, २४ जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास बोपोडी परिसरातून मोटारीतून जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडवून थांबवले. दुचाकीला कट का मारला अशी विचारणा करीत शस्त्राचा धाक दाखवून लुट केली. त्यांच्या कानातील साडेनउ हजार रूपयांची सोन्याची बाळी चोरून नेली. याप्रकरणी पाटील यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक विद्याराणी फाटे तपास करीत आहेत.

व्हिडिओ कॉलवर बोलताना मोबाइल हिसकावला

Crime News : पत्नीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाचा २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना २३ जूनला रात्री सव्वा नउच्या सुमारास येरवड्यातील सावंत पेट्रोलपंप ते कॉमरझोन परिसरात घडली आहे. याप्रकरणी ओमकार खेळगे वय २७ रा. टिंगरेनगर, येरवडा यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार ओमकार हे टिंगरेनगर परिसरात राहायला असून, २३ जूनला रात्री सव्वा नउच्या सुमारास येरवड्यातील सावंत पेट्रोलपंप परिसरात ते पायी चालत होते. त्यावेळी पत्नीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ओमकारने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top