Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार, गुन्हा दाखल

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

अहिल्यानगर रस्त्यावर कटकेवाडी येथील शंभूराज हॉटेलसमोर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवनाथ विष्णू मंजुळकर असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ एप्रिलला सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे–अहिल्यानगर रस्त्यावर कटकेवाडी येथील शंभूराज हॉटेलसमोर घडली. याबाबत किशोर पंडित पवार (वय ३४, रा. वाघोली) यांनी तक्रार दिली आहे.

पीएमपी बस पळविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक गोविंद सिंह अशोककुमार घोष (वय ३८, मूळ रा. झाशी, उत्तरप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तक्रारदाराच्या मामेभावाच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, तसेच संबंधित मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे–अहिल्यानगर मार्गावरील वाढता वेग आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणारे चालक यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाईची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×