Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेख

फेसबुकद्वारे पाठवली लिंक, जेष्ठाला ३७ लाखांचा गंडा

फेसबुकद्वारे पाठवली लिंक, जेष्ठाला ३७ लाखांचा गंडा

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. अशाच प्रकारे डेक्कन परिसरात राहणार्‍या ७१ वर्षीय जेष्ठाला सायबर चोरट्यांनी ३७ लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ जानेवारी ते २४ मार्च २०२६ कालावधीत कर्वेरोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कर्वे रोडवर राहायला असून, १९ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना फेसबुकद्वारे शेअर ट्रेडींग जाहिरातीची लिंक पाठवली. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करून अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदार जेष्ठाचा विश्वास संपादित करून विविध बँकखात्यावर रक्कम पाठविण्यास भाग पाडले. तब्बल ३७ लाख ३० हजार रूपये पाठवल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×