Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे  – शेअर ट्रेडींग जाहिरातीची लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल १४ लाख १० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १२ मार्च २०२४ ते २७ जानेवारी २०२६ कालावधीत कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसले याची निर्दोष सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील राजेश सोसायटीत राहायला असून, १२ मार्च २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर ट्रेडींग जाहिरातीची लिंक पाठवली. त्यानंतर ट्रेडींगच्या पोर्टलवर जाउन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केल्यानंतर विविध बँकखात्यात रक्कम पाठवण्यास भाग पाडले. तब्बल १४ लाख १० हजार रूपये ऑनलाईनरित्या पाठवल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×