Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसले याची निर्दोष सुटका

बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसले याची निर्दोष सुटका

न्यायालयाकडून आता सतीश भोसले याची निर्दोष मुक्तता

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बीडमधील गुन्हेगारीसह मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या. त्यापैकीच सतीश उर्फ खोक्या याच्याकडून बॅटने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. घटनेनंतर खोक्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाकडून आता खोक्याची निर्दोष मुक्तता केली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.

रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंटची वीट घातली – सविस्तर बातमी 

सतीश उर्फ खोक्या भोसले याने गतवर्षी व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यावर शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. बीड न्यायालयाने त्याची गुरुवारी (दि. २ ) निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला आहे. बाहेर येताच त्याचा मित्रपरिवार त्याच्या स्वागताला कारागृहाबाहेर होता.

कारागृहातून बाहेर आल्यानंतरही गाडीत बसून बीडकडे येतानाचा रिल्स व्हिडिओ त्याने बनवला आहे. दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला गतवर्षी मार्च २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्यावर देखील त्यावेळी टीका झाली होती. तसेच, सतीश भोसले याला अटक झाल्यानंतर त्याच्या इतरही गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामध्ये वन्यजीव शिकार केल्याबाबतही त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×