Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

प्रवाशांवरुन झालेल्या वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात घातली सिमेंटची वीट

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

रिक्षा चालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रवाशांवरुन झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रज परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण प्रकरणाच्या तपासात अमली पदार्थ विक्री उघडकीस – सविस्तर बातमी 

शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ उर्फ टायगर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरुन त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या डोक्यात घातला. पुजारी गंभीर जखमी झाले. सहायप फौजदार रवींद्र भाेसले तपास करत आहेत.

ओैंध परिसरात हाणामारी; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल 

नृत्य करताना झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना ओैंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी टाेळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत कुणाल नंदकिशोर तुजारे (वय २२, रा. श्री हनुमान मंदिराजवळ, इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भैय्या सरोदे, तेजस देवकर, ओेंकार पाटोळे (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल तुजारे याचे वडील बुधवारी (१ एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गांधी वसाहतीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करत होते. ध्वनीवर्धकावर गीते लावण्यात आली होती. त्यावेळी नाचताना आरोपी घडसिंग याला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला . या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली. कुणाल आणि त्याचा पुतण्या आरोपींना जाब विचारण्यास गेले. तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण केली. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×