Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

अपहरण प्रकरणाच्या तपासात अमली पदार्थ विक्री उघडकीस

अपहरण प्रकरणाच्या तपासात अमली पदार्थ विक्री उघडकीस

उत्तमनगर पोलिसांनी सराइतासह चौघांना अटक

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन युवतीचे प्रेमप्रकरणातून अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला सराईत अमली पदार्थ विक्रीत सामील असल्याची माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सराइतासह चौघांना अटक केली. पाेलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक – सविस्तर बातमी 

सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे), शुभम संतोष दहीभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरातून अल्पवयीन युवतीचे प्रेमप्रकरणातून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा गेल्या काही महिन्यांपासून पसार असल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सराइतांची चौकशी केली होती. राठोड हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. तो कोंढवे धावडे परिसात येणार असल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोनच्या पुड्या जप्त करण्यात आल्या.

राठोड याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात त्याने उत्तमनगर भागातील काही जणांना मेफेड्रोनची (एमडी) विक्री केल्याची माहिती मिळाली. त्याने नायर, कदम, दहीभाते यांच्याकडून मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी राठोडच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी केली. तेव्हा त्याने ऑनलाइन पद्धतीने व्यवहार केल्याचे दिसून आले. ऑनलाइन पद्धतीने त्याने नऊ लाख रुपयांचे व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले. राठाेड याने ३०० व्यवहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याने ७२ जणनाां मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणात मेफेड्रोन खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील, चेतन धनवडे, चेतन बराटे, शेलार, पाडळे, अनिरुद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×