Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक

वेगवेगळ्या प्रकरणांत ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असून, डेक्कन आणि भारती विद्यापीठ परिसरात अशाच दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मिळून ५१ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

लघुशंकेसाठी थांबला अन् रिक्षा चालकानेच बॅग चोरली – सविस्तर बातमी 

फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे एकाला सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. त्यांना ग्रुपमध्ये ऍड करून अँप डाउनलोड करण्यास सांगितले. डेक्कन परिसरातील अशोक रामचंद्र देवधर (वय ७१, रा. कर्वे रोड) यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. १९ जानेवारी ते २४ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ३७ लाख ३० हजार ७६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

भारती विद्यापीठ परिसरातील श्रीकांत बळीराम शेळके (वय ४३, रा. कात्रज) यांना युट्युब लिंकद्वारे शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी त्यांचे रजिस्ट्रेशन करून विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. मार्च २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत आरोपींनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली आहे. पोलिसांकडून प्रकरणांचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×